November 27, 2012

Majhe vichar


माझ नाव रविंद्र सोनसुरकर आहे । मी हर्बर्टपूर  ला आलो आहे । मी इथ रोज सकाळी सहा वाजता उठतो । मी आणि सचिन सर वॉकिंग ला जातो । नंतर आम्ही जॉगिंग करतो । त्याच्या नंतर आम्ही ध्यान करायला बसतो । गेल्या दहा दिवसांपासून मी इथ आहे । आणि मी खूप काही  शिकलो माझ्या मना मध्ये जी भीती होती ती सगळी निघून गेली । अटकून बोलणे हे काही गुन्हा नाही आहे । नाहीही घाबरण्याचे काही कारण आहे । मी जसा आहे खूप आनंदात आहे । इथ बाजूला एक हॉस्पिटल आहे तिथ मी रोज जातो आणि लोकांची गप्पा मारतो । त्यांना मी विचारतो तुमच्या समोर कोण अटकत बोलत असेल, तेव्हा तुमच्या मना मध्ये कसले विचार येतात । ते सांगतात असा काही नाही हेच्या मध्ये हसण्या सारख काही कारण नाही आहे । हे पण एक ईश्वराची देन आहे त्याला स्वीकारावा आणि काही संकोच मना मध्ये न आणून बिना घाबरता मांडावा । सरांची एक इथ क्लास आहे । सर इथ संगणक शिकवतात तिथ मला सर घेऊन जातात पण त्या क्लास मध्ये एक मुलगा आणि बाकी सगळे पोरी आहेत । तिथ मला सर माझ्या बद्दल सांगायला बोलतात । पण मला आदि चे दोन तीन दिवस मी घाबरून बोलत होतो । पण आता तर न घाबरता बिंदास बोलतो । सर सांगतात एकदा हि भीती गेली तर तू न अटक्ता बोलशील । आज पासून माझे टास्क  इंटरविव आहे । आज मी इंटर्वीव ला चाललो आहे ।

5 comments:

Harish Usgaonker said...

छान रविन्द्र। आपले विचार खुप सुन्दर आहे। इंटरविव साठी हार्दिक शुभेच्छा।

टिसा ब्लॉग वर हा पहिला मराठी ब्लॉग आहे। त्यासाठी अभिनंधन।

ravi1984 said...

TISA members la fakt english, hindi nahi tar marathi suddha yete

sachin said...

Great post, Ravindra! The whole idea behind this blog was to encourage posts in our mother tongue.. so that many more people can contribute and read.. Keep writing.. (I can get the sense of your post)

ravi1984 said...

thank you sir very much

Amitsingh Kushwah said...

रवि जी,
बहुत सुन्दर विचार और पहली बार मराठी में पढ़कर बहुत अच्छा लगा। आगे मराठी में हकलाहट पर अपने और अनुभव बाँटें। साधुवाद और बधाई।